+91 989 095 9698

info@kolhapurtimes.com

Breaking News

blog

काेल्हापूरात सहलीसाठी आलेल्या स्कूलबसच्या केबीनला शाॅर्टसर्किटने आग, अनर्थ टळला

बीड जिल्ह्यातील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयाची शैक्षणीक सहल कोल्हापूर इथं आली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एम एच 20 बीएल 2801 ही बस न्यू पॅलेस येथे आली. वाहनचालकानं बस पार्किंग मध्ये थांबवली असता, काही वेळानं बसच्या केबीनला शॉर्टसर्किटनं आग लागल्याचं त्याच्या लक्षात आलं. सुदैवानं बसमध्ये कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला.

बीड जिल्ह्यातील मंत्री राजस्थानी विद्यालयातील 44 मुले व 5 शिक्षक एम एच 20 बीएल 2801 या बीड आगारातील बसने कोल्हापूर इथं आले होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही सहल न्यू पॅलेस इथं आली होती. वाहनचालकानं ही बस पॅलेसमधील पार्किंगला थांबवल्यावर बसमधील सर्व विद्यार्थी व शिक्षक पॅलेस पाहण्यासाठी निघून गेले. काही वेळानं शॉर्टसर्किटनं बसच्या वाहनचालक केबीनला आग लागल्याचं वाहनचालकाच्या लक्षात आलं. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विजवली. सुदैवानं बसमध्ये कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत बसचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.