+91 989 095 9698

info@kolhapurtimes.com

Breaking News

blog

पोलीस, भरारी पथक आणि एसएसटीचा कबनुरमध्ये संयुक्त छापा, एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल चक्क दे येथे  पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांच्या संयुक्त पथकाने आज छापा घातला. या कारवाईत  देशी, विदेशी मद्य, बिअर, मोटर सायकल आणि रोख रक्कम 50 हजार 790 असा एकूण 2 लाख 64 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  विधानसभा निडणूक आचारसंहिता आणि गांधी सप्ताहनिमित्त आजच्या ड्राय डे च्या दिवशी कबनूर मधील हॉटेल चक्क दे येथे छापा घातला. या कारवाईत अशोक देवाप्पा पिंपळे (रा. कबनूर, ता. हातकणंगले) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

    इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी.आर.पाटील, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, अतूल पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक गणपती हजारे, जवान सुभाष कोले, विलास पवार, विजय माने, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक इश्वर ओमाशे यांचे पथक व स्थिर निरीक्षक पथकाचे प्रमुख सचिन पाटील, दिलीप पोवार यांनी ही कारवाई केली.  

    अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

अरबी समुद्रातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आजपर्यंत कोणाला एक रूपयाही दिलेला नाही. त्यामुळं त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणता येणार नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारनं जाणीवपुर्वक चौकशीच्या नावाखाली स्मारकाचं काम थांबवलं आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केलाय. मात्र दुसरीकडं कॅगच्या अहवालानुसार, स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार संस्थेला 20 कोटी 53 लाख रूपये अदा केले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नवाब मलीक यांनी शिवस्मारकात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आमच्याकडं असून ते लवकरच उघड करू असा इशारा भाजपला दिलाय. या परस्पर विरोधी माहितीमुळं स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला की नाही याचं कारण सखोल चौकशी केल्यावरच कळेल. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राज्यातील तमाम शिवप्रेमींकडून होत आहे.