+91 989 095 9698

info@kolhapurtimes.com

Breaking News

blog

व्हॉट्सॲप मध्ये येणार हे दोन नवीन फिचर......

वृत्तसंस्था : जगात व्हॉट्सॲपनं सोशल मीडियावर राज्य केले आहे.  सर्वात जास्त प्रमाणात वापरलं जाणारं सोशल मीडिया ॲप म्हणून त्याला ओळखलं जातं. युजर्सच्या गरजा ओळखून यामध्ये सातत्याने बदल केले जातात. आता आणखी २ नव्या फीचरची भर पडणार आहे. कंपनी यावर काम करत असून, लवकरच २ नव्या सुविधा वापरता येणार आहेत. डार्क मोड (Dark Mode) आणि सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज हे २ नवे फीचर्स व्हॉट्सॲपमध्ये सामील होणार आहेत. हे दोन्ही फीचर्स बीटा व्हर्जनवर डेवलप केले जात आहेत. 

सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज :

या फिचरमध्ये एका ठराविक वेळेनंतर म्हणजेच 5 सेकंद, एक तास, ७ दिवस किंवा ३० दिवस च्या नंतर मॅसेज आपोआप गायब होतील.  यासाठी हे फीचर इनएब्लड करावे लागणार आहे. सुरवातीला हे फीचर फक्त ग्रुप चॅटसाठी असणार आहे.

डार्क मोड :

या फीचरमध्ये बॅक ग्राउंडला ब्लू नाईट रंग असणार आहे. मात्र अक्षरांचा रंग कोणता असणार हे जाहीर करण्यात आलेले नाही. युजर्सला लाईट थीम बदलून डार्क थीम स्विच करण्याचा पर्याय मिळणार आहे. त्याला डिफॉल्ट मोड म्हणूनही निवडता येणार आहे.


अरबी समुद्रातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आजपर्यंत कोणाला एक रूपयाही दिलेला नाही. त्यामुळं त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणता येणार नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारनं जाणीवपुर्वक चौकशीच्या नावाखाली स्मारकाचं काम थांबवलं आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केलाय. मात्र दुसरीकडं कॅगच्या अहवालानुसार, स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार संस्थेला 20 कोटी 53 लाख रूपये अदा केले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नवाब मलीक यांनी शिवस्मारकात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आमच्याकडं असून ते लवकरच उघड करू असा इशारा भाजपला दिलाय. या परस्पर विरोधी माहितीमुळं स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला की नाही याचं कारण सखोल चौकशी केल्यावरच कळेल. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राज्यातील तमाम शिवप्रेमींकडून होत आहे.