+91 989 095 9698

[email protected]

Breaking News

blog

वंचित बहुजन आघाडीने समरजीत घाटगेंचा पाठिंबा काढून घेतला : अनिल म्हमाने

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी ने कागलमध्ये अपक्ष उमेदवार समरजीत घाटगे यांना पाठिंबा दिला होता. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नातू व अपक्ष असल्याने हा पाठिंबा दिल्याचे अनिल म्हमाने यांनी जाहीर केले होते. मात्र घाटगे यांनी आपण  विजयी झाल्यावर भाजपमध्ये जाणार अशी भूमिका घेतली आहे.

त्यांच्या या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडी समरजीत घाटगे यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे म्हमाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडी ही कष्टकरी, उपेक्षित, वंचित समुदायाचा पक्ष आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची सरळ लढत असणार आहे. वंचित बहुजन आघाडी नेहमीच जातीवादी धर्मांध राजकारणाच्या विरोधात भूमिका घेणारी आहे. त्यामुळे कागलमध्ये समरजीत घाटगे यांना दिलेला पाठिंबा वंचित बहुजन आघाडी पाठीमागे घेत असल्याचे म्हमाने यांनी म्हंटले आहे.