+91 989 095 9698

[email protected]

Breaking News

blog

अखेर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, पगार 25 ऑक्टोबरपुर्वी जमा होणार

कोल्हापूर : दिवाळी सणाची सुरवात यावर्षी 25 ऑक्टोबर पासून होत आहे. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना दिवाळीचा आनंद द्विगुणीत करता यावा यासाठी माहे ऑक्टोबरचा पगार निवृत्तीवेतन दिवाळीच्या एक दिवस आधी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचे शासन परिपत्रकही काढण्यात आले होते. त्यानंतर तांत्रीक अडचणीमुळे दिवाळीपुर्वी पगार देण्यात अडचण असल्याने ९ तारखेचे परिपत्रक रद्द केले होते. 

आज (15 ऑक्टोबर) शासनाने पुन्हा परिपत्रक जारी करून पुर्वीच्या परिपत्रकातील अटी शिथील केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि निवृत्तीवेतन धारकांचे पैसे 25 ऑक्टोबरपुर्वी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाराज असणार्या राज्य शासकीय कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार यात शंका नाही