+91 989 095 9698

[email protected]

Breaking News

blog

जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे अंदाजे 74 टक्के मतदान

कोल्हापूर - जिल्ह्यात आज झालेल्या मतदाना दिवशी  अंदाजे एकूण 74 टक्के मतदान झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 85.15 टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 59 टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न होता सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी विधानसभा मतदार संघ निहाय पुढीलप्रमाणे आहे.

चंदगड विधानसभा मतदार संघ-68 टक्के.  राधानगरी -75.5. कागल - 81.58.  कोल्हापूर दक्षिण-74.  करवीर -82.15 . कोल्हापूर  उत्तर  -59.  शाहूवाडी -80. हातकणंगले -71.41.  इचलकरंजी - 67.2  आणि शिरोळ विधानसभा मतदार संघात 72 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

 विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. जिल्हा प्रशासनाने सकाळच्या सत्रात मतदान करण्याच्या केलेल्या आवाहनास जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती.  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी उच्चांकी राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळच्या मतदानामध्ये दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. 90 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान केले आहे. 

मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडल्याबद्दल तसेच  मोठ्या संख्येने केलेल्या मतदानाबद्दल मतदार, मतदार जनजागृती करणारी प्रसार माध्यमे त्यांचे प्रतिनिधी, नागरिक, उमेदवार या सर्वांचे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आभार मानले.