महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची वैधता सर्वोच्च न्यायालयात; उद्या सुनावणी!

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या, सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, संध्याकाळी ६ वाजल्यानंतर टाकलेल्या ७६ लाख मतांचा डेटा उपलब्ध नाही, जे निवडणूक कायद्यानुसार अनिवार्य आहे. या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला असून, हा निवडणूक कायद्यांचे उल्लंघन असल्याचा दावा केला आहे.
या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाकडून यावर स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.