महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत मीटिंग हॉलमधील निकृष्ट काम उघड! सार्वजनिक निधीचा अपव्यय!

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत येथील नुकत्याच नूतनीकरण केलेल्या मीटिंग हॉलमध्ये निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आले असून त्यातील पीव्हीसी (PVP) कामकाज काही दिवसांतच ढासळले असून कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय करून हलगर्जीपणा करण्यात आला असल्याचा आरोप होत आहे. हॉलमधील सुविधा कमी दर्जाच्या साहित्यामुळे काही प्रमाणात धोकादायकही ठरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तत्पूर्वक चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच चौकशी अहवाल सादर करण्याचे येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.गावकऱ्यांचा आग्रह आहे की अशा प्रकारची निष्काळजीपणा भविष्यात होऊ नये यासाठी तांत्रिक तपासणी करून जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button