राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे ‘मोरया पुरस्कार २०२५’ स्पर्धेचे आयोजन!

कागल (सलीम शेख ): राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनने सलग आठव्या वर्षी ‘मोरया पुरस्कार २०२५’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत तरुण मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले आहे.
स्पर्धेची उद्दिष्ट्ये आणि स्वरूप
श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवादरम्यान विधायक कार्य करणाऱ्या तरुण मंडळांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत विविध विभागांतील विजेत्यांना मोरया पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. यामध्ये पुढील विभागांचा समावेश आहे.गणेश मूर्ती,आरास सजावट,ऐतिहासिक सजीव देखावा,सामाजिक कार्य,तांत्रिक देखावा,गणेश विसर्जन मिरवणूक. ही स्पर्धा कागल शहर, गडहिंग्लज शहर, मुरगूड शहर, सिद्धनेर्ली, चिखली, कसबा सांगाव, बोरवडे, सेनापती कापशी, कड़गाव-कौलगे आणि उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी स्वतंत्रपणे घेतली जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण मंडळांनी मंगळवार, दिनांक २ सप्टेंबरपर्यंत आपली नोंदणी करावी, असे आवाहन घाटगे यांनी केले आहे.




