कसबा सांगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) २०० कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

कसबा सांगाव, ता. कागल (सलीम शेख ) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) ताकदीत मोठी वाढ झाली आहे. विविध पक्षांतील सुमारे २०० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. सागर माळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशामुळे कसबा सांगावमधील गटाला मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, “ज्या विश्वासाने आपण सर्वजण या पक्षात आला आहात, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. कसबा सांगावच्या नूतन कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहीन.”
या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राजू माने, माजी सरपंच रणजीत कांबळे, नेमिनाथ चौगुले, सागर माळी, दीपक गंगाई, अमोल माळी, मारुती पाटील, संजय हेगडे, अनिल भोजे, अजित चौगुले, अजित शेटे, संजय चितारी, संभाजी कोपर्डे, संतोष माळी, रावसो मगदूम, मेहताब मुल्ला, अरविंद माळी, अमर कांबळे, अमर शिंदे, सुरेश लोखंडे, माशुक मुल्ला, बाळू माने, विठ्ठल चव्हाण, संजय आवळे, सागर चव्हाण, शामराव जगताप, श्रीकांत भोजे, पप्पू कांबळे, किरण घाडगे, शकिल कलावंत, अस्लम गजबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.