महाराष्ट्र ग्रामीण
कागल मध्ये तिरंगा पदयात्रा!

कागल (सलीम शेख) : माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या कागल शहर शाखेने आयोजित केलेल्या या पदयात्रेत शहराध्यक्ष अरुण सोनुले, संयोजक दिग्विजय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून ही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान घोषणाबाजी करत उपस्थितांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक वाढण्यास मदत होईल, असे मत संजय घाटगे यांनी व्यक्त केले.