विघाता फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कोल्हापूर (सलीम शेख ): 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विधाता सामाजिक फाउंडेशनने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच कोल्हापूर येथील विकास विद्या मंदिर शाळेला भेटवस्तू म्हणून माईक देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा, कारागृह (सब-जेल) अधिकारी नविता नाईक उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा योग्य वापर आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडियाच्या गैरवापरातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीवर कसे नियंत्रण मिळवावे, याबद्दलही त्यांनी मोलाचे विचार मांडले.
यावेळी डॉ. कानडे, नविता नाईक, जयदत्त जोशीलकर, पल्लवी चव्हाण, सरिता गवळी, विद्या’ज किचन, कमल कोळेकर, वैशाली खाडे, स्वाती खाडे, नारायणी कुंभार, अबिद शेख, मृणाली गोधडे, विद्या हुंडे-शर्मा, मिनाक्षी सुतार, पूजा यादव, अमृता गलांडे, धनंजय सराटे, विठ्ठल खंदारे आणि दस्तगीर सर्जेखान यांनी कार्यक्रमासाठी देणगी देऊन सहकार्य केले. विधाता सामाजिक फाउंडेशनने या सर्व देणगीदारांचे आभार मानले आणि भविष्यातदेखील असेच सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त केली.