महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड ला 50 पुस्तकांचा अनमोल खजिना भेट

मुरगुड (सुभाष भोसले): युनिक पिक्चर्स आणि समकालीन प्रकाशन या दोन संस्था मराठी पत्रकारिता आणि प्रकाशनच्या क्षेत्रात गेली तर 33 वर्षे काम करत आहेत.समकालीन प्रकाशन संस्था आणि शांतीवन यांनी एकत्र येऊन वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ,जागर समकालीन वाचनाचा ही चळवळ उभी केली. उद्याचे नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक नकारात्मक गोष्टी अवतीभवती पहाव्या लागत आहेत. याच वातावरणात उमेद जागवणारी सकारात्मक आणि प्रेरणादायी युनिक फीचर्स च्या समकालीन संस्थेने पुस्तके प्रकाशित केली आहेत यामधील 50 प्रेरणादायी पुस्तके शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या शाळेला घाटकोपर मुंबई येथील जगन्नाथ डी कुलकर्णी यांनी देणगी म्हणून बहाल केली आहेत. ती पुस्तके आज शाळेत उपलब्ध झाले आहेत. ही पुस्तके शाळेला उपलब्ध करून देण्यासाठी जागर प्रकल्प समन्वयक सारिका कळसकर पुणे यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. ग्रंथपाल प्रशांत डेळेकर यांचे विशेष योगदान मिळाले.ही पुस्तके ग्रंथपाल प्रशांत डेळेकर यांच्या कडे प्रदान करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button