महाराष्ट्र ग्रामीण

पट्टणकोडोलीत शिंदे गटाचा शड्डू; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा लढवणार!

पट्टणकोडोली, ता. हातकणंगले (सलीम शेख) : पट्टणकोडोली येथे शिवसेना (शिंदे गट) यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या आदेशानुसार, शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात दोन्ही जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असावा, असा ठराव करत शिंदे गटाने निवडणुकीचा शड्डू ठोकला आहे.
या बैठकीत सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार असण्यावर एकमत दर्शवले. तसेच, या बालेकिल्ल्यात विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहनही करण्यात आले.
राजकीय वर्तुळात या निर्णयाला विशेष महत्त्व दिले जात आहे. शिंदे गटाने स्थानिक पातळीवर दाखवलेला हा आत्मविश्वास भविष्यातील जिल्ह्यातील निवडणुकांच्या समीकरणांवर मोठा प्रभाव पाडू शकतो, असे मानले जात आहे.
या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी, पट्टणकोडोली शहरप्रमुख शिवानंद पणदे, शिव कामगार सेना उपजिल्हाप्रमुख आनंदा मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक किसन तिरपणकर, अरविंद जाधव, गोरखनाथ माळी, तसेच शाहू सोसायटीचे चेअरमन प्रकाश जाधव, एकनाथ भोसले, सोहन दवडते, संतोष मगदूम, फिरोज जमादार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button