महाराष्ट्र ग्रामीण

राधानगरी पोलीसां कडुन गणेश आगमन मिरवणुकीत डीजे लावुन व पुंगळ्या काढून नियमभंग करणा-या कार्यकर्त्यांवर कारवाई!

तसेच दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढून वाहने चालविणारे कार्यकर्त्यांवर कारवाई

राधानगरी (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव शांततेत पार पाडणच्या अनुषंगाने आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बी वापराबाबत निर्बंध घालुन दिलेले आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील गणेशोत्सव शांततेत पार पाडणे कामी सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आज रोजी गणेश मुर्ती आगमन अनुषंगाने राधानगरी तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान आमजाई व्हरवडे, पिरळ या गावामध्ये मिरवणुकीमध्ये दुचाकी गाडीच्या सायलेंसर मधील पुंगळ्या काढुन कर्कश आवाज करून गाडी चालविणा-या एकुण ०३ मोटारसायकल ताब्यात घेतल्या असुन संबंधीतांवर कोर्टात खटले पाठविणेत येणार आहेत. तसेच सरवडे गावामध्ये गणेश आगमन मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बीचा वापर केल्याचे निदर्शनास आलेले असुन सरवडे येथील १० गणेश मंडळांचे साऊंड चे नमुने घेण्यात आलेले असुन त्यांचेवर देखील ध्वनी प्रदुषण अनुषंगाने कारवाई करणेत येणार आहे. मिरवणुकीत खटले दाखल झालेल्या तरुणांचे पोलीस व्हेरीफीकेश मध्ये नोंद होवुन त्याचा विपरीत परीणाम भविष्यावर होवु शकतो.

तरी सर्व गणेश तरुण मंडळांना आवाहन करणेत येते की, गणेशमुर्ती मिरवणुकी मध्ये कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदुषण होवु देवुन नये, स्त्री नृत्यांगना नाचवू नयेत तसेच लेसर लाईट वापरु नयेत अशा गोष्टींचा वापर टाळुन समाजपयोगी कार्य करावीत, मंडळांमध्ये सीसीटीव्ही बसवावे, ग्रंथालये उभारावेत. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, करीअर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सारखे उपक्रम राबवावे जेणेकरुन त्याचा समाजात त्याचा सदुपयोग होवुन आदर्श तरुण पिढी घडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button