राधानगरी धरणातून विसर्ग सुरू २ दारे उघडे, ५ बंद

राधानगरी (सलीम शेख ) : दिनांक २० ऑगस्ट २०२५ आज पहाटेच्या सुमारास राधानगरी धरणातील स्वयंचलित नियंत्रण प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. सकाळी ४.५० वाजता आणि ४.५३ वाजता धरणाची द्वारे क्रमांक १ ते ५ बंद करण्यात आली असून, सध्या द्वार क्रमांक ६ व ७ उघडे आहेत.
विसर्गाची माहिती:
– स्वयंचलित द्वार क्र. ६ व ७ मधून: २८५६ क्यूसेक
– BOT पॉवर हाऊस मधून: १५०० क्यूसेक
– एकूण विसर्ग: ४३५६ क्यूसेक
हा विसर्ग नदीपात्रात नियंत्रित स्वरूपात सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाळी परिस्थिती लक्षात घेता धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचा विसर्ग नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे.
सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.धरणातील स्थितीवर प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जातील.