महाराष्ट्र ग्रामीण

नृसिंहवाडीत सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय: १२० घरकुलांचे वाटप आणि २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

नृसिंहवाडी (सलीम शेख ) : समाजसेवेचा दीप प्रज्वलित करत महाराष्ट्र प्रदेश जनता दल (सेक्युलर) आणि समस्त जैन समाजाच्या संयुक्त प्रयत्नातून नृसिंहवाडी येथे एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम पार पडला. संजय सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात १२० गरजू कुटुंबांना घरकुलांचे वाटप करण्यात आले, तर २०० होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
जैन समाजातील उदार व्यक्तींनी या घरकुल प्रकल्पासाठी तब्बल ११ कोटी रुपयांची आर्थिक मदत करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचे स्वप्नातील घर साकार झाले असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन व खत मंत्रालय महामंडळाचे संचालक डॉ. संजयदादा पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनता दल (सेक्युलर) चे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे आणि गुरुदत्तचे कार्यकारी संचालक राहुल घाडगे यांनी उपस्थित राहून समाजकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण मानगावे (सचिव, जनता दल सेक्युलर) आणि पत्रकार राजगोंड पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समर्पित कार्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.
या ऐतिहासिक कार्यक्रमात चंद्रकांत मोरे, शिवाजीराव माने देशमुख, प्रमोद पाटील, वसंतराव पाटील, विश्वासराव बाळीघाटे आणि माजी आमदार शाहजहान डोंगरगावकर यांसारख्या मान्यवरांनी सहभाग घेतला. तालुक्यातील जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.


या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, समाजातील परोपकार आणि एकतेचे सुंदर उदाहरण नृसिंहवाडीने साकारले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button