गोकुळ दूध संघाची शिरोळ-हातकणंगले तालुक्यासाठी संपर्क सभा उत्साहात संपन्न!

शिरोळ (सलीम शेख ) : गोकुळ दूध संघाच्यावतीने दूध उत्पादक आणि दूध संस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याची वार्षिक संपर्क सभा उत्साहात पार पडली. नूतन चेअरमन मा. नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सभेत दूध उत्पादकांनी मांडलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर, इतर महत्त्वाच्या सूचनांवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले.
सभेदरम्यान, गोकुळच्या पशुसंवर्धन, संगणक आणि संकलन विभागांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच, दूध संस्था व उत्पादकांना म्हैस दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या संपर्क सभेला संघाचे संचालक रणजीत पाटील, अजित नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, युवराज पाटील बापू, अंबरीषसिंह घाटगे, अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, चेतन नरके, मुरलीधर जाधव, शौमिका महाडिक, अंजनाताई रेडेकर, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.