कुरुंदवाड भैरववाडी परिसरात पूरग्रस्तांत शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान, भरपाईची मागणी तीव्र!

प्रतिनिधी -सलीम शेख
कुरुंदवाड (ता. शिरोळ) – भैरववाडी परिसरात आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरे, घरे आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदणी रोड, शिरोळ रोड आणि आसपासचा परिसर ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र सततच्या पुरामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
पुराची स्थिती गंभीर – पाणी लवकर येते, पण ओसरत नाही.गावातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, पूर्वी पूर आल्यावर पाणी लवकर निघून जात असे, मात्र अलीकडच्या काळात पाणी लवकर येते आणि दीर्घकाळ टिकते. यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होत आहे. नागरिकांनी अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने याची सखोल पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.या भागात 2005, 2019, 2021 आणि आता 2025 मध्येही पूर आल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने ते हताश झाले आहेत.या वेळी रणजीत डांगे (भैरववाडी), किरण बिरंजे, विठोबा कोळेकर, रावसाहेब जोग यांच्यासह अनेक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची आणि नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई देण्याची मागणी केली.
शासनाकडे मागणी अलमट्टी धरणाच्या पाणी व्यवस्थापनाची तपासणी करावी.पूर नियंत्रणासाठी शास्त्रशुद्ध धोरण आखावे.शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.ऊस उत्पादन क्षेत्राचे संरक्षण करावे.