महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर मंत्रालयात तज्ञ समितीची बैठक!

मुंबई (सलीम शेख ) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात तज्ञ समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे सह-अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या समस्या, त्यांचे अधिकार आणि हितसंबंधांचे संरक्षण यावर भर देण्यात आला. तसेच, शासकीय स्तरावर समन्वय साधण्यासाठी विविध मुद्द्यांवर विचारविनिमय झाला.

महाराष्ट्रातील मराठी बांधवांची ओळख, संस्कृती आणि अधिकार जपण्याची जबाबदारी शासनाची आहे, आणि यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सीमाभागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी भूमिका घेण्यावर आणि या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे चर्चा केली.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, शिवाजी जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




