महाराष्ट्र ग्रामीण
भाजप अल्पसंख्यांक मोर्चातर्फे ‘पेड मां के नाम’ उपक्रम!

कोल्हापूर (सलीम शेख ) : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. याच ‘सेवा पंधरवडा’चा एक भाग म्हणून ‘एक पेड मां के नाम’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम कोल्हापूर येथे राबविण्यात आला.
हा उपक्रम भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. आजम जमादार यांच्या नियोजनाखाली बागल चौक येथे घेण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी नाजीम आत्तार (अल्पसंख्यांक मोर्चा-कोल्हापूरचे सरचिटणीस), तसेच मोर्चाचे चिटणीस, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




