जनसुरक्षा विधेयकाविरोधात गडहिंग्लजमध्ये शिवसेनेचे निदर्शने!

गडहिंग्लज (सलीम शेख ) : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करण्यासाठी आज गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा येथील शिवसेनेने उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ जोरदार निदर्शने केली. हे विधेयक व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा आरोप करत, हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत शिंत्रे यांनी शासनाचा निषेध केला. “हा कायदा सामान्य नागरिकांचे अधिकार हिरावून घेणारा असून, याला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे,” असे ते म्हणाले.

या निदर्शनांमध्ये शिवसेना, युवा सेना, आणि महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सहसंपर्कप्रमुख रियाज शमनजी, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, महिला जिल्हा संघटिका शांताताई जाधव, तालुकाप्रमुख अजित खोत, युवराज पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, तसेच विष्णू गावडे, श्रीशैल साखरे, प्रकाश रावळ, मारुती जाधव, वसंत नाईक, सुरेश हेबाळे, संजय पाटील, प्रकाश जाधव, सागर हेबाळे, किरण नागुर्डेकर, बाळू कुंभार, मनीष हावळ, कृष्णात कांबळे, विनोद पाटील, विलास येमाटे, तेजस घेवडे, पांडू मनेकरी, संभाजी येडुरकर, शंकर गवळी आणि वैभव खोडवे यांचा समावेश होता.
शिवसैनिकांनी या कायद्याविरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.




