महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या समस्यांवर आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ): गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली गोशिमा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वसाहतीतील रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योजकांना भेडसावत असलेल्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली.आमदार महाडिक यांनी उद्योजकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून लवकरच ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. “गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत ही कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. येथील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मला पूर्ण जाणीव आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या प्रारंभी गोशिमा अध्यक्ष सुनील शेळके यांनी आमदार महाडिक यांचे स्वागत करत वसाहतीतील प्रलंबित समस्यांचा आढावा घेतला. उद्योजकांच्या वतीने मूलभूत सुविधांची तातडीने उपलब्धता आणि उद्योगवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.


बैठकीला गोशिमा उपाध्यक्ष संजय देशिंगे, अमोल यादव, राजवर्धन जगदाळे, स्वरूप कदम, रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, व्ही.आर. जगताप आणि विनयकुमार चौगुले यांसारखे प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
या बैठकीमुळे उद्योजकांमध्ये त्यांच्या समस्या मार्गी लागतील अशी सकारात्मक आशा निर्माण झाली असून, औद्योगिक वसाहतीच्या विकासाला गती मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button