गोकुळ शिरगाव पोलिसांना विशेष कामगिरीबद्दल प्रशस्तिपत्र!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ): गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका विशेष तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.जे. मगदूम मॅडम, पोलीस कर्मचारी विनोद कुंभार, भरत कोरवी, संदेश कांबळे आणि दिलीप इदे यांना हे प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी केलेल्या विशेष तपासामुळे आणि केलेल्या उत्कृष्ट कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी ऍडिशनल पोलीस कमिशनर धीरज कुमार व सब पोलीस कमिशनर सुजित कुमार क्षीरसागर उपस्थित होते.या सन्मानामुळे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे नाव जिल्ह्याभरात चर्चेत आले असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




