गोशिमाच्या अध्यक्षपदी सुनील शेळके, उपाध्यक्षपदी संजय देशिंगे यांची निवड!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला) : गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (गोशिमा) संचालक मंडळाच्या बैठकीत २०२५-२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुनील पंडितराव शेळके यांची, तर उपाध्यक्षपदी संजय मधुकर देशिंगे यांची निवड झाली.
या बैठकीत मानद सचिवपदी अमोल दिलीप यादव आणि खजिनदारपदी राजवर्धन पोपटराव जगदाळे यांचीही एकमताने निवड करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान संचालक दीपक श्रीपतराव चोरगे यांनी भूषवले.
यावेळी मावळते अध्यक्ष स्वरूप जयसिंगराव कदम यांनी आपल्या कार्यकाळातील विविध कामांचा आढावा घेतला. त्यांनी औद्योगिक वसाहतीतील ग्रामपंचायतींना कचरा उचलण्याची सुविधा, अग्निशमन केंद्र उभारणी, वसाहतीतील इतर प्रश्न आणि गोशिमाला मिळालेल्या सीएसआर प्रमाणपत्राचा उल्लेख केला.
नूतन अध्यक्ष सुनील शेळके यांनी उद्योजकांच्या अडचणी दूर करणे, मूलभूत सुविधा पुरवणे, कचरा व्यवस्थापन आणि उद्योगांसाठी उपयुक्त विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.
या वेळी नचिकेत कुंभोजकर, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, रणजीत पाटील आणि विश्वजीत जगताप उपस्थित होते.




