महाराष्ट्र ग्रामीण

हातकणंगले पोलिसांची मोठी कारवाई: ३१.४५ लाख रुपयांचा गुटखा जप्त, चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल!

हातकणंगले (सलीम शेख ) : हातकणंगले पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या एका विशेष कारवाईत, मानवी आरोग्यास हानिकारक असलेला ३१ लाख ४५ हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी एकूण चार आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पहाटे ०४:५७ वाजता आणाभाऊ साठे नगर, रुई, ता. हातकणंगले येथे करण्यात आली. पोलीस रात्रीची गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलँन्ड कंपनीच्या एका टेम्पोमधून (क्रमांक एमएच ५१ सी ०६४७) मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून हा टेम्पो ताब्यात घेतला आणि त्यातील गुटखा जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाला एकूण ३१,४५,००० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ. यात विमल पान मसाला आणि वि-१ तंबाखूचा समावेश आहे.गुटखा वाहतुकीसाठी वापरला जाणारा एक अशोक लेलँन्ड टेम्पो (क्रमांक एमएच ५१ सी ०६४७), ज्याची जुनी किंमत सुमारे ७ लाख रुपये आहे.एक मोबाईल फोन, ज्याची किंमत ५,००० रुपये मुद्दे माल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी यासीन दस्तगीर जमादार (वय २९, रा. संग्राम चौक, इचलकरंजी),अविनाश वडगावे (रा. रुई, ता. हातकणंगले),अनिकेत मांगलेकर (रा. इचलकरंजी), प्रमोद पाटील (रा. इचलकरंजी, टेम्पो मालक)
यातील मुख्य आरोपी यासीन दस्तगीर जमादार हा टेम्पो चालवत होता. हा गुटखा अविनाश वडगावे आणि अनिकेत मांगलेकर यांच्या मालकीचा असून, टेम्पो मालक प्रमोद पाटील याच्या सांगण्यावरून तो घेऊन जात होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटखा आणि तंबाखू मानवी आरोग्यास हानिकारक असून, त्यांच्या सेवनाने हृदयविकार, तोंडाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होतात याची जाणीव असतानाही आरोपींनी महाराष्ट्रात बंदी असलेल्या या पदार्थांची वाहतूक केली.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक पवार, तसेच पोलीस अंमलदार मच्छिंद्र पटेकर, गणेश खरजे, प्रशांत पोवार, विठ्ठल जाधव (चालक) आणि होमगार्ड मुजावर, वाणेकर, कोळी, सौदे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
हातकणंगले पोलीस ठाण्याने केलेली ही उत्कृष्ट कारवाई असून, यामुळे बेकायदेशीर गुटखा वाहतुकीला मोठा आळा बसेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button