कागल नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन; ‘पर्यावरणपूरक विसर्जना’वर भर!

कागल (सलीम शेख ) : कागल नगरपरिषदेने मंगळवारी (दि. २ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरात विशेष व्यवस्था केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी, शहराच्या १० प्रभागांमध्ये १५ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. या कामासाठी नगरपरिषदेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत.
गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान कोणतीही विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गणेश मूर्ती व गौरी विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा आणि विसर्जन कुंडांचा वापर करावा.
या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रकाश पाटील आणि अमोल कांबळे यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते सर्व पथकांवर देखरेख ठेवतील आणि गणेश विसर्जन योग्यरित्या पार पाडण्यासाठी समन्वय साधतील. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांची मदत घेण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत.
विविध ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी नेमलेली पथके खालीलप्रमाणे आहेत:
* नाम. हसनसो मुश्रीफ सांस्कृतिक हॉल, श्रमिक वसाहत: परवेझ मुलाणी, विनायक रजपूत आणि अनंत खोत यांच्या नेतृत्वाखालील पथक.
* गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, जयसिंगराव पार्क: रमेश मुझे, इकबाल जमादार आणि रणजित कांबळे यांच्यासह पथक.
* तु. बा. नाईक विद्या मंदिर, शाहू स्टेडियम शेजारी: आप्पासाहेब भोपळे, संजय सोनुले यांच्या नेतृत्वाखालील पथक.
* संस्कार इंग्लिश स्कूल, अनंत रोटो: विशाल कोळी आणि प्रकाश हिरुगडे यांच्या नेतृत्वाखाली पथक.
* हिंदुराव घाटगे शाळा चौक, खर्डेकर: पियुष कुलकर्णी, स्वप्नील चव्हाण यांच्यासह पथक.
* गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, आझाद चौक: पॉल सोनुले, सुमित पोतदार यांच्या नेतृत्वाखाली पथक.
* यशवंत किल्ला: राजू वाघेला, धनाजी सुतार यांच्या नेतृत्वाखाली पथक.
* संत रोहिदास विद्या मंदिर, ठाकरे चौक: सुरेश शेळके आणि रणजित शितोळे यांच्या नेतृत्वाखाली पथक.
* दुधगंगा विद्यालय, काळम्मावाडी वसाहत: सुरेश रेळेकर, कुशाल कानडे यांच्या नेतृत्वाखाली पथक.
या सर्व ठिकाणी स्थानिक कर्मचाऱ्यांसह ठेका कर्मचारीही विसर्जनाच्या कामात मदत करणार आहेत. नगरपरिषदेच्या या पुढाकारामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला गती मिळणार आहे.




