कागल येथे दुचाकी चोरी; चोरट्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल!

कागल (सलीम शेख) : कागल येथील अखिलेश पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आज दुपारी अंदाजे १ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्याने गाडीचे लॉक तोडून ही चोरी केली असून, त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ आणि फोटो सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
चोरलेल्या गाडीचा क्रमांक एम एच १० सी झेड २९१७ ही असून ती हिरो होंडा शाइन कंपनीची आहे. या घटनेनंतर गाडी मालक आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या चोरट्याबद्दल किंवा गाडीबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास, कृपया प्रशांत जवळके (फोन नंबर ७८२२९४३४५५) किंवा राजू सुतार (फोन नंबर ९२८४८५५७६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गाडी आणि चोरट्याचा फोटो व व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे, जेणेकरून या चोरट्याला लवकरात लवकर पकडण्यास मदत होईल.




