महाराष्ट्र ग्रामीण

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज मध्ये महिला सुरक्षा अभियान कार्य शाळा संपन्न!

कागल (सुभाष भोसले ) : श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज मध्ये बेटी बचाओ बेढी पढाओ अंतर्गत महिला सुरक्षा अभियान कार्यशाळा संपन्न झाली . प्राचार्य टी पोवार , उपमुख्याध्यापक आर एस पाटील, पर्यवेक्षिका यु सी पाखरे पाखरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी वैशाली नाईक समुपदेशक पंचायत समिती कागल, निलम धनवडे, रोहीणी घोसाळकर समुपदेशक सखी वन स्टॉप क्राइसिस सेंटर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . महिलांच्या वरील वाढता हिंसाचार व अत्याचार आज संपूर्ण जगासमोरील एक ज्वलंत प्रश्न बनला आहे .महिला जितक्या घराबाहेर सुरक्षित नाहीत तितक्याच त्या घरामध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत . लिंगभेदाच्या आधारावर अनेक ठिकाणी महिलांच्यावर शारीरिक, मानसिक, लैगिक,आर्थिक अत्याचार अशा प्रकारची हिंसा व अत्याचार झालेल्या घटना आपण पाहतो अशा हिंसाचाराची शिकार झालेल्या महिला व मुली यांना वैद्यकीय, मानसिक,कायदेशीर पोलिसांची मदत आणि काही वेळेस तिच्या सुरक्षितता व निवाऱ्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे अशा पीडित महिलांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे सखी वन्स स्टॉप क्रायसिस सेंटर उपक्रम सुरू करण्यात आला आहे .कोल्हापूर जिल्ह्यात हे केंद्र २९ जुलै २०१९ पासून सुरू झाले आहे या ठिकाणी पीडित महिलांना सेवा देण्यासाठी २४ तास मदतनीस मदत करत आहेत केंद्र व्यवस्थापक,वैद्यकीय कर्मचारी हे २४ तास कधीही महिलांना गरज भासल्यास तातडीची मदत करतात त्यामध्ये पोलीस रुग्णवाहिका, पोलीस केस नोंदवण्यास मदत, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन वैद्यकीय मदत, मानसिक आधार व समुपदेशन इत्यादी सुविधा मिळवून देण्याची व्यवस्था आहे या केंद्रामार्फत पाच दिवसासाठी पिडीत महिलेला तात्पुरते निवास भोजन याची व्यवस्था केंद्रातच केली जाते .पाच दिवसापेक्षा जास्त निवासाची आवश्यकता असल्यास शासकीय महिला राज्यगृह/ महिला आधार गृह येथे व्यवस्था करण्यात येते. पीडित महिलेला जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे सखी वन स्टॉप सेंटर मार्फत १८ वर्षाखालील लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींकरता मनोधैर्य योजना तसेच महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ मिळवून दिला जातो .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button