करनूरच्या आरती शिंदे आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित!

कागल (प्रतिनिधी) : करनूर तालुका कागल येथील अंगणवाडी सेविका आरती युवराज शिंदे यांना आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे .हा सन्मान हसन मुश्रीफ फाउंडेशन कागलच्या वतीने करण्यात आला . राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्मानित व्यक्तींनाच हा पुरस्कार देण्यात येतो. हसनसो मुश्रीफ फाउंडेशन च्या वतीने केलेला आरती शिंदे यांचा सन्मान म्हणजे करनुरच्या अंगणवाडीचा गौरव आहे ,असेच म्हणावे लागेल. आरती शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. अंगणवाडीच्या बालचमुंच्या पाठीवर थाप देत त्यांनी रचलेला हा शिक्षणाचा पाया निश्चितच विद्यार्थ्यांच्या जीवनात दिशा देणारा ठरतोय असे गौरव उद्गार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना काढले.
गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ ,गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, पंचायत समिती सभापती रमेश तोडकर, माजी नगराध्यक्ष सुनील माळी, करनुरच्या सरपंच सौ संगीता जगदाळे, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकराव संकपाळ, विलास पवार सर, करनूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शाखेरा शेख- मुजावर, युवराज शिंदे, राज महंमद शेख, श्रीमती चिंगुबाई शिंदे ,पूर्वा शिंदे, राजकुमार बाळासाहेब शिंदे, राजवर्धन शिंदे व परिवार उपस्थित होते.



