कागल नगरपरिषद, कागल नशामुक्तीसाठी ‘रन अँड वॉक’ चे आयोजन!

कागल (सुपर भारत सलीम शेख ): कागल नगरपालिकेतर्फे नशा मुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत एक विशेष ‘रन अँड वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरूक करणे हा आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम शाही दसरा महोत्सवाच्या काळात होत आहे.हा एक विशेष रन अँड वॉक आहे, ज्यामध्ये कोल्हापूरला नशामुक्त बनवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कागल नगरपरिषदेने एक निःशुल्क नोंदणी लिंक तयार केली आहे. https://forms.gle/8LXbXojmxzSG1krM9 या लिंकवर जाऊन तुम्ही आपली नोंदणी करू शकता.
चौकट
*स्पर्धेचे नाव: रन अँड वॉक
* वयोमर्यादा: सर्व वयोगटातील नागरिकांसाठी
* ठिकाण: गैबी चौक, कागल
* दिनांक: रविवार, २८ सप्टेंबर २०२५
* वेळ: सकाळी ६.०० वाजता
या ‘रन अँड वॉक’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशा मुक्त समाजासाठी आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन कागल नगरपरिषदेने केले आहे.




