महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात ‘महात्मा फुले’ आणि ‘सावित्रीबाई फुले’ गुणवंत शिक्षक पुरस्कारांची घोषणा

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विंग (प्रोटॉन) च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ‘महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५’ आणि ‘सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून एकूण ५० शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांनी शालेय तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक कार्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान दिला जात आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे एका भव्य शिक्षण परिषदेत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विंग ही एक राष्ट्रव्यापी संघटना आहे. या संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुके आणि महानगरपालिका क्षेत्रातील ५० शिक्षकांची निवड या पुरस्कारांसाठी केली आहे.
संस्थेच्या वतीने सर्व संबंधितांना या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे शिक्षण क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button