महाराष्ट्र ग्रामीण

अनंत चतुर्दशीनिमित्त व्हाईट आर्मी संस्थेचा उपक्रम; मिरवणुकीत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर!

कोल्हापूर (सलीम शेख ) : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने निघणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची काळजी घेण्यासाठी ‘व्हाईट आर्मी’ संस्थेने वैद्यकीय मदत शिबिराचे आयोजन केले होते. शहराच्या प्रमुख मार्गांवर- पापाची तिकटी, मिरजकर तिकटी आणि बिनखांबी गणेश मंदिरापाशी हे मोफत शिबिर सुरू होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांनी सेवा दिली. डॉ. राजेश सातपुते, डॉ. हरीश नांगरे, डॉ. शिवराज देसाई, डॉ. बदृद्दिन मणेर, डॉ. स्वप्नील पाटील यांच्यासह नर्स निलोफर मुजावर आणि राधिका सातपुते यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. ‘अस्टर आधार’चे डॉ. अमोल कोडोलीकर आणि व्हाईट आर्मी मेडिकल टीमने या कामात सहभाग घेतला.
या शिबिराला कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, निमा, निहा, लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर तरुण मंडळ, कोल्हापूर पोलिस वेल्फेअर, कोल्हापूर प्रेस क्लब, तसेच सकाळ, पुढारी, तरुण भारत, लोकमत यांसारख्या विविध वृत्तपत्र समूहांनी सहकार्य केले.
या उपक्रमात व्हाईट आर्मीच्या स्कूल स्टाफमधील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. कोळेकर सर, मोरे सर, परमणे मॅडम, भोसले मॅडम, संध्या मॅडम, मर्जीना मॅडम, कमते मॅडम आणि मुल्ला सर यांनी विद्यार्थ्यांना शिबिरात मार्गदर्शन केले. तसेच, देवचंद कॉलेज, निपाणी येथील विद्यार्थी आणि कॅडेट कोर यांनीही शिबिरासाठी देणगीदार आणि स्वयंसेवक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या शिबिरात व्हाईट आर्मी वॉटर रेस्क्यू टीमनेही आपली सेवा बजावली. सचिन भोसले, विशाल खंडागळे, विनायक भाट, शैलेश, सिद्धेश, ओंकार, सागरिका भोसले, प्रज्ञा जिरगे यांनी मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तयारी ठेवली होती.
व्हाईट आर्मीने केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल अनेक कोल्हापूरकरांनी त्यांचे आभार मानले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button