महाराष्ट्र ग्रामीण

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिया आघाडीचा ठिय्या संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा 2024 रद्द करण्याची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : जनसामान्यांचा आवाज दाबणाऱ्या आणि घटनेला न जुमानणाऱ्या जनसुरक्षा कायदा २०२४ (Public Safety Act 2024) च्या विरोधात आज इंडिया आघाडीने कोल्हापुरात निषेध रॅली काढली. हा अन्यायकारक कायदा रद्द करावा, या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.


जनसुरक्षा कायदा २०२४ हा नागरिकांचे अधिकार हिरावून घेत असून, लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे इंडिया आघाडीचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे सरकारला कोणत्याही व्यक्तीला चौकशीविना ताब्यात घेण्याचे अमर्याद अधिकार मिळतात, ज्यामुळे सामान्य लोकांचा आवाज दडपला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


या निषेध रॅलीत आणि ठिय्या आंदोलनात आमदार सतेज पाटील,व्ही.बी.पाटील, आर.के.पोवार, संजय पवार, विजयराव देवणे, सचिन चव्हाण, राजू लाटकर, कॉ. संपत देसाई, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, बाबुराव कदम, बाळासाहेब सरनाईक, भरत रसाळे, कॉ. अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सुभाष जाधव, संजय मोहिते, अनिल घाटगे, भारतीताई पोवार, सरलाताई पाटील, चंद्रकांत यादव, सुभाष देसाई, यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन हा कायदा तातडीने रद्द करावा अशी मागणी केली. हा कायदा रद्द न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button