“जुरल इथोस” लॉ फर्मचे कोल्हापुरात थाटात उद्घाटन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरात घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर “जुरल इथोस” या नवीन लॉ फर्मचे उद्घाटन उत्साहात पार पडले. युवासेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख ॲड. चेतन शिंदे आणि त्यांचे सहकारी ॲड. सलमान मालदार, ॲड. अभिषेक देवकर, ॲड. सचिन पाटील, ॲड. रोहिदास भांगरे यांनी या लॉ फर्मची सुरुवात केली आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन माझ्या हस्ते आणि स्टार उद्योग समूहाचे चेअरमन, उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचीही विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मी नव्याने सुरू झालेल्या लॉ फर्मच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. मी सांगितले की, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना झाली, ज्यामुळे अनेक पक्षकारांना मोठा फायदा झाला आहे. हे यश सर्व वकील बांधव आणि कोल्हापूरवासीयांच्या अथक लढ्याचे प्रतीक आहे.
मी “जुरल इथोस” च्या टीमला आवाहन केले की, या लॉ फर्मच्या माध्यमातून काम करताना त्यांनी आलेल्या प्रत्येक पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहावे आणि निःस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करावी.
या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रताप पाटील, उद्योजक सुरेश चंदवाणी, ज्येष्ठ वकील ॲड. माणिक मुळीक आणि ॲड. शिवाजीराव राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




