ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटने चा ५ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव!

कोल्हापूर (बाळासो कांबळे (कागल तालुका): ‘ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत’ (All India Police Janseva Sanghatana Bharat) चा पाचवा वर्धापन दिन नुकताच २२ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘एकटी बेघर संस्था’ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रकाश डोंगळे आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा मा. सौ. गीतांजली चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात संघटनेच्या चांगल्या कार्याची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सदस्यांना ‘जिल्हा गौरव पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय महिला अध्यक्षा मा. सौ. गीतांजली चौगुले यांना त्यांच्या सामाजिक कार्य, धडाडीची समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा सन्मानार्थ ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा एकटी बेघर संस्थेच्या चांगल्या कार्याचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा मा. अनुराधा भोसले यांना सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यात मा. श्री. कृष्णात पाटील (कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष), मा. सौ. प्रियांका माने (कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा), मा. श्री. दशरथ तानवडे (कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष), मा. श्री. पवन सिध्दुनुले (हुपरी शहर अध्यक्ष), मा. श्री. हणमंत गस्ती (सदस्य), मा. श्री. शुभम कुदळे (सदस्य), मा. सौ. शितल पडवळ (सातारा जिल्हा सदस्य) यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, एकटी संस्थेतील मा. सौ. पुष्पा पठारे मॅडम, मा. श्री. उमाकांत कांबळे सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष (कंदलगाव) मा. श्री. अभिजीत पाटील सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




