मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लॉकर रूमच्या पायाभरणीचा शुभारंभ!

प्रतिनिधी: बाळासो कांबळे (कागल तालुका): मुरगूड येथील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरगूड च्या मुख्य कार्यालयाच्या नवीन लॉकर रूमच्या पायाभरणीचा शुभारंभ संस्थेचे हितचिंतक श्री. पांडुरंग हरी खराडे (काका) यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक मा. धोंडीबा मकानदार, व्हा. चेअरमन मधुकर कुंभार, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना श्री. पांडुरंग हरी खराडे (काका) यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेऊन, त्यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी, संस्थेचे संस्थापक मा. धोंडीबा मकानदार यांनी संस्थेच्या भावी योजनांची माहिती दिली. व्हा. चेअरमन मधुकर कुंभार यांनी संस्थेच्या उत्तम कामकाजाची प्रशंसा केली आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुरगूड नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ही नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे. ही नवीन लॉकर रूम संस्थेच्या वाढीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे हा सोहळा यशस्वी झाला.




