मुरगूड नगरपरिषदेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी!

कागल ( बाळासो कांबळे) मुरगूड नगरपरिषदेच्या ओ. एस. ऍडम यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि जागृत मालक फाउंडेशनच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सांस्कृतिक भवनच्या मागे असलेल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मावा आणि गुटखा खाण्यावर बंदी घालण्यात यावी आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या सार्वजनिक ठिकाणी काही मुले धूम्रपान, मावा, आणि गुटखा खात असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अशा प्रकारच्या क्रिया टाळण्यात याव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाच्या मार्गदर्शनाखाली , जागृत मालक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सिकंदर जमादार, जागृत मालक फाउंडेशनचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वर्णे, राहुल कांबळे उपस्थित होते.




