नांदारी फाटा येथे बस रस्त्याच्या बाहेर; जेसीबीसीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले!

राजापूर (प्रतिनिधी): राजापूरहून कोल्हापूरला जाणाऱ्या एका बसचा नांदारी फाटा येथे चालकचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाहेर गेली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना आज सकाळी घडली. बस (राजापूर-कोल्हापूर) नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर होती. नांदारी फाटा येथील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढली. त्यामुळे बस पूर्णपणे रस्त्यावरून खाली उतरून एका बाजूला कलंडली.
प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून सुरक्षित जागा घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात येत आहे. जेसीबीच्या सहाय्याने बस हळू-हळू खेचून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि रस्ता सुरळीत सुरू आहे.
पुढील तपासणीत बसच्या बाहेर जाण्याचे नेमके कारण कळेल, परंतु प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचा रस्त्यावरचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.




