महाराष्ट्र ग्रामीण

शहापूर पोलिसांत दुचाकी आणि घराच्या पार्किंगला आग लावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

शहापूर (सलीम शेख ‌) : साक्षीदार होऊ नये म्हणून धमकी दिल्यानंतर एका व्यक्तीच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी आणि पार्किंगच्या भागाला आग लावल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता तारदाळ येथील संगमनगर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तात्यासो शिवलींग खिलारे (वय ६०, रा. स्वराज कॉलनी, तारदाळ) यांच्या घराच्या दारात गंगा प्रवीण पाटील आणि अब्दुलकय्युम नौशाद तांबोळी हे दोन आरोपी आले. त्यांनी खिलारे यांना “तू माझ्याविरुद्ध असलेल्या प्रकरणात साक्षीदार का झालास? यापूर्वी साक्षीदार होऊ नको असे सांगितले होते, तरीही तू साक्षीदार झालास, आता तुझी मोटारसायकल व घर पेटवून देतो,” अशी धमकी दिली.
यानंतर आरोपींपैकी एकाने खिलारे यांच्या एम.एच.०९ बी.जे.८८९५ या दुचाकीवर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्याने आग लावली. यामुळे दुचाकी आणि घराच्या पार्किंगच्या भागाला आग लागली, ज्यात अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
खिलारे यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुटे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button