महाराष्ट्र ग्रामीण
शहापूर परिसरातून दुचाकीची चोरी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी शितम विजयकुमार अतिग्रे (वय ३०, रा. जावईवाडी, ता. हातकणंगले) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या पोर्चमधून हिरो कंपनीची करिझमा आर (MH09-CT-2169) ही पांढऱ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत अंदाजे २० हजार रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने स्वतः वाहनाचा शोध घेतला, मात्र न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.




