पैलवान रणवीर पाटील यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत देदीप्यमान यश!

शिंगणापूर: येथील कुस्ती स्पर्धेत जय हनुमान तालीम मंडळ, भामटे च्या युवा पैलवान रणवीर दत्तात्रय पाटील यांनी 62 किलो वजन गटात नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम सामन्यात धडक मारत मिळवलेल्या या विजयामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रणवीरने हे यश आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि सातत्यपूर्ण सरावामुळे मिळवले आहे. त्यांना त्यांचे वडील आणि वस्ताद श्री. दत्ता पाटील, तसेच वस्ताद सरदार पाटील आणि श्रीवर्धन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रणवीर यांचे चुलते श्री. शिवाजी पाटील यांनीही त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्यांच्या यशाचा मार्ग सुकर झाला.
रणवीर हा अंबुबाई इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असून, त्यांच्या या यशात शाळेचेही मोठे योगदान आहे. शाळेचे प्राचार्य श्री. के. डी. पाटील, क्रीडा शिक्षिका नीता संकपाळ मॅडम, तेजस पाटील सर आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याला नेहमीच पाठिंबा दिला.
वस्ताद दत्ता पाटील यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या पै. रणवीर पाटील यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीस शहाजी गायकवाड, अण्णा मोरे, सुनील तोरस्कर, प्रशांत पाटील, वस्ताद ग्रुप गोकुळ शिरगाव आणि गावातील सर्व तरुणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




