महाराष्ट्र ग्रामीण

सह्यगिरीची पूरग्रस्तांसाठी एक पणती माणूसकीची मच्छीमारी करणाऱ्या भोई बांधवांसोबत केली दिवाळी साजरी!

गगनबावडा (विशेष प्रतिनिधी): गनबावडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेने करमाळा तालुक्यातील पुरग्रस्त भोई बांधवांच्या प्रति सामाजिक जीणीव जपत एक पणती माणुसकीची हा उपक्रम हाती घेतला . आणि भोई वस्तीवर अशेचे आकाश कंदील लावत… एकीचे तोरण बांधून ..माणुसकीची पणती तेवत ठेवून. पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली .या सामाजिक उपक्रमाने पूरग्रस्तांचे चेहरे आनंदाने फुलले सह्यगिरी परिवार दरवर्षी वंचित दुर्बल घटकांसाठी एक पणती माणुसकीची उपक्रम राबवत असतात .यावर्षी या उपक्रमाचे सातवे वर्ष . सोल्हापूर जिल्हातील करमाळा तालुक्यातील सीना नदीमध्ये मच्छीमारी करणारे भोई बांधव बोरगावात राहतात .सप्टेंबर महिन्यामध्ये आलेल्या महापुरात भोई बांधवांची वस्ती पूर्ण पाण्याखाली गेली होती . शेतीबाडी ,संसार साहित्य, विद्यार्थ्यांची दप्तर पाण्यात वाहून गेली. भोई वस्तीमध्ये सह्यगिरी परिवाराने दारोदारी रांगोळी काढून, दारी तोरणे बांधून ,आकाश कंदील लावले . भोई बांधवांना एकत्र करून महिलांना साडी -चोळी , पुरुषांना गमजा -टोपी अशी नवी कपडे देण्यात आली .शालेय विद्यार्थ्यांना दप्तर पाटी व शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले सर्व कुटुंबांना दिवाळीचा फराळ, साबण, उठणे सुगंधी तेल देऊन दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतले .
सह्यगिरीचे समन्वयक सुधीर शिंदे यांनी संगीत दिवाळी साजरी करून पूरग्रस्तांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण केले. सह्यगिरीचे सोलापूर सन्वयक बलभीम बनसोडे यांनी उपक्रमाचा हेतू विशद केला . कार्यक्रमास बोरगाव कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ मस्के,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक भोज, केंद्रप्रमुख निशांत खारगे,राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेचे संचालक अशोक दुधे ,जुनी पेन्शन संघटनेचे करमाळा तालुका सचिव प्रताप राऊत, जि.प . प्राथ.शाळा करंजे चे विषय शिक्षक शिवलाल शिंदे, बोरगाव शाळेचे उपशिक्षक श्रीराम बुलबुले उपस्थित होते .
गगनबावडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेने सोलापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी साजरी केलेल्या अनोख्या दिवाळीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button