महाराष्ट्र ग्रामीण

कागलजवळ दुधाच्या टँकरची धडक; १९ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार, टँकर चालकांवर गुन्हा दाखल!

कागल (सलीम शेख) : कागल येथे झालेल्या एका भीषण अपघातात १९ वर्षीय दुचाकीस्वार अजय प्रकाश वायदंडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुधाच्या टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास कागल ते निढोरी जाणारे रोडवर वडडवाडी चौक, तेंडुलकर वजन काट्याजवळ घडला. पिंपळगाव खुर्द येथे अजय प्रकाश वायदंडे (वय १९) हा त्याची स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एम एच-०९-जी एस-६५७४) घेऊन कागलकडे येत असताना, समोरून आलेल्या अशोक लेलँड दुधाच्या टँकर (क्र. जी जे-२१-वाय-६१८०) वरील चालक सुलेमान तस्लीम खान (रा. जयसिंगपूर) याने भरधाव वेगाने वाहन चालवले.
रस्त्यावरील खड्डा चुकवताना त्याने टँकर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आणला आणि अजयच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत अजयच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे तो घटनास्थळीच मृत्युमुखी पडला.
मृत अजय वायदंडे यांचे गावातील रहिवासी शुभम प्रकाश आकुर्डे यांनी तातडीने कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार, कागल पोलिसांनी आरोपी टँकर चालक सुलेमान खान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कागल पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button