कागल नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सलग चार वर्षे दिवाळी फराळ वाटप ,जैन अलर्ट ग्रुपचे शहा बंधूंचा गौरव!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कागल येथे समाजातील प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञता आणि आपुलकी जपणे या माणुसकीच्या भावनेतून कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी सलग चार वर्षे दिवाळी फराळ वाटपाचा सुंदर उपक्रम राबविल्याबद्दल जैन अलर्ट ग्रुपचे नीरज शहा, अभय शहा आणि स्वप्नील शहा यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
शहा बंधूंनी राबवलेल्या या उपक्रमातून त्यांनी स्वच्छता कर्मचारी वर्गाप्रती आदर, सन्मान आणि आत्मीयतेचा सुंदर संदेश समाजात दिला आहे. त्यांच्या सततच्या सेवाभावी वृत्तीमुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे. कागल नगरपरिषदने व नितीन कांबळे , अमोल कांबळे, बादल कांबळे, कौतुक कांबळे, प्रथमेश कांबळे ,दीपक कांबळे, सर्व महिला आणि पुरुष आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनी जैन अलर्ट ग्रुपचे शहा बंधूंनी केलेल्या या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, त्यांचा हा प्रवास असाच प्रेरणादायी आणि उज्ज्वल राहो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी कागल नगर परिषदेचे अधिकारी नितीन कांबळे शहा बंधूंना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.




