महाराष्ट्र ग्रामीण

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची सतीश माळगे यांनी घेतली भेट!

कोल्हापूर (सलीम शेख ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विषयांच्या मागण्यांसाठी पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे (दादा) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची भेट घेतली. गारगोटी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत, पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन पालकमंत्री आबिटकर यांना सुपूर्द करण्यात आले.
जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या मार्गदर्शनाखालील या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण समस्या आणि विकासकामांशी संबंधित विविध मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी प्रकाशजी आबिटकर यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला त्यांच्या संबंधित विषयात जातीने लक्ष घालून कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राधानगरीचे कुंडलिक कांबळे, वाहतूक आघाडीचे कार्याध्यक्ष सलमान मोलवी, धीरज निकम, प्रवीण आजरेकर, बाळासाहेब कांबळे, प्रवीण निगवेकर, सिकंदर मुजावर, युवराज महाडिक, आशिष महाजन, मयुरेश चिकोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री आबिटकर यांच्या आश्वासनामुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button