महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगावचे सुपुत्र बबनराव सदाशिव शिंदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड!

कोल्हापूर (सलीम शेख ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्ह्याचे संघर्ष नेते व गोकुळ शिरगावचे सुपुत्र बबनराव सदाशिव शिंदे यांची पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे‌ महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी ही निवड घोषित केली.
बबनराव शिंदे हे गेल्या तीस वर्षांपासून महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक कार्यात अग्रसेर होते. त्यांनी आपल्या कार्यात सुरवात स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुका सरचिटणीस या पदापासून केली होती.
त्यांच्या ३० वर्षांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी स्वतः या निवडीमध्ये लक्ष घातले होते. या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जक्कापा कांबळे आणि मुंबई-सातारा निरीक्षक हेमंत भोसले यांचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे, बबनराव शिंदे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्या या महत्वपूर्ण निवडीमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाला राज्यात अधिक बळकटी मिळण्याची शक्यता आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button