शहापूर येथे युवकावर आठ जणांचा सामूहिक हल्ला — पोलिसांत गुन्हा दाखल

शहापूर (सलीम शेख): हातकणंगले तालुक्यातील शहापूर येथे समाधान बार परिसरात एका युवकावर आठ जणांनी एकत्र येऊन मारहाण केल्याची घटना घडली असून, याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अरमान रझाक नायकवडी (वय 23, रा.शहापुर) यांना त्यांचा मित्र अमोल हिरेमठ यांनी आरोपी अजित भंडारे यांनी समाधान बारजवळ बोलावले असल्याचे सांगितले. फिर्यादी तेथे गेले असता आरोपी अजित भंडारे, निलेश पारटे, विनायक शेवाळे, अमोल हिरेमठ, ओंकार सोनवणे, राकेश पाटील, संकेत माडंवकर (सर्व रा. सावली सोसायटी) आणि अक्षय नरळे (रा.गणेशनगर, शहापुर) यांनी एकत्र येऊन “तुला लय मस्ती आली आहे” असे म्हणत त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यावेळी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोनचा देखील त्यांनी नाश केला.
ही घटना शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून, फिर्यादी यांनी 5 ऑक्टोबर रोजी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संबंधित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल झुगर यांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरे करत आहेत.




