महाराष्ट्र ग्रामीण

शाहुवाडीत विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांचा धडक छापा – कोटींचा मुद्देमाल जप्त!

शाहुवाडी (सलीम शेख) : शाहुवाडी परिसरात अवैध विदेशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयशर ट्रक (MH 18-BA-8511) ला शाहुवाडी हद्दीत अडवण्यात आले. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये पोलांड प्राईड कंपनीच्या १३८० बॉक्स विदेशी दारू आढळून आली. दारूसह ट्रक आणि इतर साहित्य मिळून एकूण १,१६,६१,०३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संतोष बंडू पेटकर (रा. इस्लामपूर, सांगली) याला अटक करण्यात आली असून ट्रकचा मालक प्रल्हाद लिंबा धनगर (रा. शिरपूर, धुळे) असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, सतिश सुर्यवंशी, संजय पडवळ आणि अमर वासुदेव यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीविरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचे उदाहरण ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button