महाराष्ट्र ग्रामीण

कर्नाटक सीमेजवळ शिवसेनेचे आंदोलन रोखले; मराठी अस्मितेसाठी घोषणाबाजी!

कागल (सलीम शेख ) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोगणोळी नदीजवळील टोलनाक्याच्या अलीकडे जोरदार आंदोलन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कर्नाटक सरकार वर्धापनदिन साजरा करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी “लढा मराठी अस्मितेचा” आणि “ध्यास संयुक्त महाराष्ट्राचा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रात १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो, याच पार्श्वभूमीवर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्र पोलिसांनी आंदोलकांना सीमेजवळच अडवून ताब्यात घेतले. या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील, शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना प्रमुख म्हाळू करीकट्टे, महिला आघाडी संघटक कांचन माने, उपशहरप्रमुख प्रभाकर थोरात, विभाग प्रमुख वैभव आडके व हरी पाटील, युवा सेना सदस्य शशिकांत चव्हाण, धनाजी नागळाळे, जिवन कोळी आदींची उपस्थिती होती. आंदोलकांना अडवल्यामुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button